google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा कान कापला

सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा कान कापला

Crime story's
जळगाव - धरणगाव तालुक्यातील रेल या गावी अज्ञात चोराने चोरी करण्याच्या उद्देशाने वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश करीत त्या महिलेचा कान कापत सोन्याचे दागिने चोरून नेले. Crime news
Robbery case
29 डिसेंबर च्या रात्री रेल गावातील विमलाबाई पाटील ह्या पत्र्याच्या शेड मध्ये खाटेवर झोपल्या होत्या, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने घरी प्रवेश करीत वृद्ध महिलेच्या कानात असलेले सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता त्या वृद्ध महिलेने प्रतिकार केला मात्र चोराने चाकूच्या साहायाने त्या वृद्ध महिलेचा कान कापत कानात असलेले सोन्याचे आभूषण चोरून नेले.
चोराने वृद्ध महिला प्रतिकार करीत असताना महिलेच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण केली जखमी केले.
सकाळी विमलाबाई पाटील ह्या उठल्या नसल्याने शेजाऱ्यांनी घरी जाऊन बघितले असता ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, शेजाऱ्यांनी त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. Gold robbery
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता त्यांनी अज्ञात दरोडेखोरावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने