google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Bhadravati crime news । ७५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त! महिला ताब्यात

Bhadravati crime news । ७५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त! महिला ताब्यात

Bhadravati crime news : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलीस याविरुद्ध कारवाई मोहीम राबवित आहे, २५ एप्रिल रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे एका महिलेच्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
Bhadravati crime news


गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने चंदनखेडा येथील रहिवासी सौ. निर्मला शामराव चैके यांच्या घराच्या स्टोअर रूम ची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मजा व ईगल कंपनीचा साठा असा एकूण ७५ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. woman caught selling tobacco

प्रेमात अडथळा, चंद्रपुरात एकाची हत्या 

निर्मला चैके विरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी अनुप आस्टूनकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे व योगेश घाटोळे यांनी केली.  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने