google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Daytime robbery Chandrapur । चंद्रपुरात चोरांचा धुमाकूळ! दिवसाही घरं सुरक्षित नाहीत!

Daytime robbery Chandrapur । चंद्रपुरात चोरांचा धुमाकूळ! दिवसाही घरं सुरक्षित नाहीत!

Daytime robbery Chandrapur । चंद्रपूर शहरात चोरीचे प्रमाण वाढत आहे, बंद घरात चोरी नंतर दिवसाढवळ्या घरात कुटुंब असताना सुद्धा चोरी होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. चंद्रपूर शहरात दुपारी घरी आराम करीत असलेल्या नागरिकांच्या घरी चोरी झाल्याची बाब उघडकीस आली असून शहर पोलिसांनी या प्रकरणात एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.
Daytime robbery Chandrapur


घुटकाला वार्डातील ४० वर्षीय विभा क्षिरसागर या दुपारी आराम करीत असताना अज्ञात इसमाने घरी प्रवेश करीत अलमारीत ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रकमेवर हात साफ केला. याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. 


घटनास्थळाची पाहणी करीत गुन्ह्यात चोरी गेलेला माल याचा तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला असता एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर चोरी केली असल्याचा गुन्हा कबूल केला, यासह एका बंद घरात चोरी केल्याची बाब चौकशीत उघड झाली. पोलिसांनी आरोपीकडून २ लक्ष ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. Police action on Chandrapur theft cases

सदरची यशस्वी कारवाई मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदीप बच्चीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.     
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने