google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc महिला नायब तहसीलदाराला भर रस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न

महिला नायब तहसीलदाराला भर रस्त्यात जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Crimestorys
बीड - केज तालुक्यातील नायब तहसीलदार यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण राज्य हादरुन गेले. Beed crime
नायब तहसीलदार आशा वाघ या आज दुपारी जेवण आटोपून तहसील कार्यालयाकडे येत होत्या, त्याच दरम्यान एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडविला, त्या वाहनातून एका महिलेसह 4 जणांनी वाघ यांच्यावर हल्ला केला, त्यादरम्यान त्या महिलेने बॉटल मधील पेट्रोल नायब तहसीलदार वाघ यांच्या अंगावर टाकत त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्ल्यातून वाघ बचावल्या. Attempt to burn alive
याआधी सुद्धा तहसील कार्यालयात प्रवेश करीत कौटुंबिक कलहातून वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. Attack on Tehsildar
सध्या वाघ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने