google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Crimestorys
पुणे - वर्ष 2018 मध्ये महिलेला फिरायला नेऊन जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, याप्रकरणी सोलापुरातील पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
ती तक्रार पीडितेने परत घ्यावी यासाठी आरोपीने तिला भरदिवसा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
वर्ष 2013 ते 17 कालावधीत आरोपीने प्रेमाचे आमिष 38 वर्षीय महिलेला दिले होते.
त्यानंतर आरोपी रमजान पटेल व पीडितेमध्ये लग्नावरून चांगलाच वाद निर्माण झाला, त्यांनतर वाद मिटावा यासाठी वर्ष 2018 मध्ये आरोपीने पीडितेला फिरायला नेत तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. Pune crime
याबाबत आजही ते प्रकरण न्यायालयात सुरू आहे, ती तक्रार पीडित महिलेने परत घ्यावी यासाठी पटेल ने अनेक प्रयत्न केले मात्र पीडितेने तक्रार परत न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहली.
8 दिवसांपूर्वी आरोपी रमजान हा आपल्याया कुटुंबासाहित पीडितेच्या घराजवळ राहायला आला होता. Crime news
त्यानंतर त्याने महिलेला तक्रार मागे घ्यावी यासाठी धमकी देणे सुरू केले, 18 जानेवारीला भीमनगर मध्ये राहणाऱ्या पीडितेच्या घरी आरोपीने प्रवेश करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने या हल्ल्यात ती महिला बचावली. Rape victim


याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक काकडे तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने