google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc पार्किंगच्या वादात युवकाची हत्या

पार्किंगच्या वादात युवकाची हत्या

Crimestorys
नागपूर - घरासमोर वाहन पार्क करण्यावरून 2 गटात वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने यामध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली. Nagpur crime
दोन दिवसांपूर्वी राम साहू व योगेश धामणे यांचा मोनू रायतदार, सुदामा व नंदलाल रायतदार यांच्या सोबत वाहन पार्क करण्यावरून वाद झाला होता, वादात बघण्याची धमकी एकमेकांना देण्यात आली होती. Murder news
गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यावर योगेश हा रामभाऊ च्या घरी गेला होता, दोघे बाहेर बोलत असताना मोनू ने दोघांसोबत वाद घातला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने रामभाऊ ने मोनू ला मारहाण करण्यास सुरुवात केली. मोनू चा आवाज ऐकून नंदलाल व सुदामा यांनी चाकू, दंडा व लोखंडी रॉडने योगेशला मारण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत योगेशचा मृत्यू झाला, या घटनेत रामभाऊ व मोनू सुद्धा गंभीर जखमी झाल्याने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. Maharashtra crime news
पोलिसांनी योगेशच्या हत्याप्रकरणी नंदलाल, मोनू व सुदामा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने