google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc 15 जणांनी घरात घुसून महिला सरपंचाला केली मारहाण

15 जणांनी घरात घुसून महिला सरपंचाला केली मारहाण

Crime storys
बुलढाणा - नुकतेच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकी संपन्न झाल्या असून यामध्ये अनेकांनी अभूतपूर्व विजय प्राप्त केला, मात्र काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागल्याने दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. Buldhana crime
Maharashtra crime
मात्र बुलढाणा जिल्ह्यात सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेसोबत गावातील 10 ते 15 जणांनी मिळून धक्कादायक कृत्य केलं, यामुळे बुलढाणा जिल्हा चांगलाच हादरुन गेला.
मेहकर तालुक्यातील सारशिव गावातील महिला सरपंच रमाबाई जाधव यांना गावातील 10 ते 15 जणांनी घरात घुसून मारहाण केली, सोबतच जाधव यांच्या मुलांना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाण करण्याआधी तू फुकट सरपंच झाली असे टोमणे जाधव यांना मारण्यात आले होते, हा प्रकार घडल्यावर जाधव यांनी जानेफळ पोलीस स्टेशन गाठले मात्र त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदविली नाही.
त्यानंतर जाधव यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला, पोलीस अधीक्षकांनी सर्व प्रकरण ऐकून घेत जाधव यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितले, त्यानंतर पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये जाधव गेल्या असता त्यांना बसवून ठेवण्यात आले, या मारहाणीत जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून सुद्धा या गंभीर प्रकारावर पोलीस साधा गुन्हा दाखल करीत नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
महिला अत्याचाराविरोधात शासन कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेतअसून सुद्धा पोलीस मात्र कारवाई करीत नाही.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने