google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Temple Robbery Cases । चंद्रपूर तिरुपती बालाजी मंदिर दरोडा प्रकरणातील आरोपीला अखेर अटक!

Temple Robbery Cases । चंद्रपूर तिरुपती बालाजी मंदिर दरोडा प्रकरणातील आरोपीला अखेर अटक!

Temple Robbery cases १२ जानेवारी २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील दाताला मार्गावरील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या जबरी दरोड्यातील एका आरोपीला तब्बल ३ महिन्यांनी अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश मिळाले आहे.

Temple Robbery Cases


वर्षाच्या सुरुवातीला दाताला मार्गावरील तिरुपती बालाजी मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास ४ ते ५ जणांनी तोंडावर दुपट्टा, अंगात जर्किंग घातलेले आरोपींनि प्रवेश करीत सुरक्षारक्षक ४८ वर्षीय लहू ज्ञानेश्वर चिकाटे यांचे हातपाय व तोंड बांधून त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल व दानपेटी मधील पैसे असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन लंपास झाले होते. robbery investigation

दारूची वाहतूक करताना दोघांना अटक, चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई 

रामनगर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला मात्र त्यांना आधी यश मिळाले नाही, आरोपी मिळत नसल्याने रामनगर पोलिसांनी खचून न जाता तांत्रिक देउष्ट्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल केली, या प्रकरणात अहिल्यानगर येथील हल्ली मुक्काम इंदिरानगर चंद्रपूर २६ वर्षीय अक्षय दिलीप जाधव याला अटक करण्यात आली.

सदर प्रकरणातील इतर आरोपींचा रामनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक शोध घेत आहे. उशिरा का होईना रामनगर पोलिसांना या जबरी दरोडा प्रकरणात यश मिळाले. temple robbery

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, उगले, पोलीस कर्मचारी पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे व ब्यूलटी साखरे यांनी केली.  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने