google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Gold fraud case | फसवणुकीची सोनेरी संधी, वर्गमैत्रिणीची फसवणूक

Gold fraud case | फसवणुकीची सोनेरी संधी, वर्गमैत्रिणीची फसवणूक

 Gold fraud case : शाळेत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत चंद्रपूर येथील एका सराफा दांपत्याने वरोडा येथील महिलेस फसवून तिच्या जवळील 97 ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले असून याची किंमत ६ लाख ५५ हजार रुपये होत आहे.वरोडा पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चंद्रपूर येथील दांपत्यासह तिच्या त्यांच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली आहे. 

Gold fraud case


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील टिळक वार्डात राहणाऱ्या रुचिदा रोहीत वाढई व चंद्रपूर निवासी रिया सुरज सोनी, वय ३० वर्ष हया शाळेतील वर्ग मैत्रिण असून व रिया सोनी तिचे पती सुरज शिवकुमार सोनी यांचे चंद्रपूर येथील गांधी चौक सराफा लाईनमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे.

       सन २०१९ मध्ये रियाने रुचिता वाढईचा मोबाईल नंबर मिळवून तिच्याशी ओळख वाढवून बोलणे सुरू केले.ती रूचिदाशी  खुप आपूलकीने बोलत होती. 

       मार्च-२०२० मध्ये रियाने तुझेकडे रक्कम असेल तर दे मी त्यावर व्याज देणार म्हटल्याने तिला रूचिदाने तिला ५०,००० रूपये दिले होते. त्यांनी रूचिदाला त्यावर दरमहा २००० रुपये व्याज देवून तिचा विश्वास संपादन केला होता. Gold cheating case


मे-२०२० मध्ये देशात कोरानाची साथ असल्याने लॉकडाउन लागले होते.दळणवळणाचे व उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. या कोरोना काळात रूचिदाला पैश्याची आवश्यकता असल्याने पैश्याच्या अडचणीबाबत रुचिदाने आपली मैत्रीण रिया सोनीला सांगीतले व पैशाची मागणी केली.  L तेव्हा रिया सोनी हिने तिला सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे घेण्याचा सल्ला दिला. Jewelry fraud alert

          अचानक वर्गमैत्रिण रिया सुरज सोनी, तिचा पती  सुरज शिवकुमार सोनी आणि सासू भारती शिवकुमार सोनी हे तिघेही  24 मे 2020 रोजी रुचिता वाढई हिचे घरी वरोडा येथे भेटायला आले. 

घरफोडी करणारी तिकडी गुन्हे शाखेच्या ताब्यात

       त्यावेळी रियाचे पती व त्यांचेकडे पैसे मागायला आलेले  भोजराज सुधाकर खडसे रा. बोर्डा हे घरी होते. यावेळी रिया सोनी हिने आपल्याकडे अनेक जण  सोनं गहाण ठेवतात. त्यामुळे तू पण ठेव असे रुचिदाला सांगितले. त्यावर आपण ५० टक्के रक्कम देतो म्हणून सांगीतले.यास  रिया सोनीचा पती व सासूने सुध्दा दुजोरा देत सोने गहाण ठेवायला सांगीतले.

        पैशांची गरज असल्याने रुचिदा व तिचे पती दोघेही सोने गहाण ठेवण्यास तयार झाले.त्यांनी भोजराज खडसे यांचे समक्ष रिया सोनी, तिचे पती व सासू यांचेवर विश्वास ठेउन सोन्याचे मंगळसुत्र ४८ ग्रॅम अंदाजे किंमत ३,५०,०००/-रू. , सोन्याचे मोतीचुर रिंग ५ ग्रॅम,  किंमत ३०,००० रूपये,  सोन्याची कांडी ७ ग्रॅम किंमत ४०,०००रू., डोरले २. ३३० ग्रॅम किंमत १५.००० रू., लेडीज रिंग ४.०५० ग्रॅम किंमत २५,०००रू. ,सोन्याचे कानातले ४.३४० ग्रॅम किंमत ३०,००० रूपये , सोन्याची चेन व लॉकेट २०.११० ग्रॅम किंमत १,२५,०००रू.सोन्याची चेन व लॉकेट ६.५७ ग्रॅम किंमत ४०,००० रू. असे एकूण  ६,५५,०००/- रुपये किमतीचे 97 ग्रॅम सोन्याचे दागीने गहाण ठेवण्याकरीता रिया  सोनी, पती  सुरज  सोनी व सासू भारती शिवकुमार सोनी यांना दिले.

     तेव्हा आता आपणाकडे रोख रक्कम नसल्याने तुला दोन दिवसात रक्कम आणून देतो असे सांगून रिया सोनीने सुचिता वाढई हिला पंजाब नॅशनल बँक, नागपूर रोड चंद्रपूर येथील चेक क्रमांक ५१०२८१ असलेला २०,०००/-रू. चा, चेक क्रमांक ५१०२८२ असलेला २,५०,०००/-रू. चा आणि तिसरा चेक क्रमांक ५१०२८४ असलेला ५०,०००/-रू. चा असे एकूण ३,२०,००० रुपयांचे तारीख न लिहिलेले चेक दिले.

       आपण दोन दिवसात सगळी रक्कम देऊन चेक घेऊन जाऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. वाढई दांपत्याने गहाण सोने गहाण ठेवल्याची पावती मागितली असता आपण अचानक वरोड्याला आलो आहोत. त्यामुळे पावती आणलेली नाही असे सांगून एका साध्या कागदावर दागिन्याचे वर्णन लिहून दिले व 97 ग्रॅम सोने घेऊन ते निघून गेले.

       दोन दिवसाचा कालावधी आटपाटोपल्यानंतरही सोनी कुटुंब रक्कम घेऊन न आल्याने वाढई यांनी त्यांना कॉल केला असता ते आज देतो,उद्या देतो असे सांगत होते.पैसे घेण्यासाठी वाढई दांपत्य चंद्रपूर येथील त्यांच्या दुकानात गेले असता दुकान बंद असल्याचे आढळत होते.कधी चालू असले तर दुकानातील ग्राहकांसमोर विषय काढू नका असे सांगत ते टाळाटाळ करत.

     मार्च 2022 मध्ये रुचिदाचे पती रक्कम मागायला गेले असता भारती सोनी यांनी ई एस ए एफ स्मॉल फायनान्स बँक चंद्रपूर शाखेचे 50 हजार रुपयांचे तीन चेक दिले. हे चेक बँकेत टाकले असता ते वटवल्या गेले नाही.त्यामुळे रुचिदाचे पती व भाऊ चंद्रपूर येथे गेले असता आपण रक्कम देत आहो असे सांगत चेक मागितले व ते फाडून टाकले.

          त्यामुळे वारंवार सोने किंवा पैशाची मागणी करूनही न मिळाल्याने रुचिदा रोहित वाढई यांनी वरोडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. वरोडा पोलिसांनी याप्रकरणी रिया सोनी, तिचा पती सुरज सोनी व सासू भारती सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

      सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने