google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc CCTV footage crime | सीसीटीव्हीच्या मदतीने सराफा दुकानातील सोन्याची चोरी उघड; अवघ्या 2 तासांत आरोपी गजाआड

CCTV footage crime | सीसीटीव्हीच्या मदतीने सराफा दुकानातील सोन्याची चोरी उघड; अवघ्या 2 तासांत आरोपी गजाआड

 CCTV footage crime : चंद्रपूर शहरातील हरी ओम ज्वेलर्स आणि टिकमचंद सराफ अँड ज्वेलर्समध्ये सोन्याच्या अंगठीची चोरी करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

CCTV footage crime


घटना कशी घडली?  

१२ फेब्रुवारी रोजी आरोपीने एका सराफा दुकानात सोन्याची अंगठी दाखवण्याची मागणी केली. दुकानदाराने अंगठ्यांचा ट्रे समोर ठेवल्यावर आरोपीने एक अंगठी हातात घेतली. काही वेळाने त्याने हातचलाखी करत खोटी अंगठी ट्रेमध्ये टाकून खरी अंगठी लपवली व "मी नंतर येतो" असे सांगून निघून गेला.  

राजुरा येथे वाळू तस्करांवर कारवाई, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त


दुकानदाराच्या लक्षात आले की एका अंगठीचा टॅग दिसत नाही. त्यामुळे त्याने सीसीटीव्ही फूटेज तपासले असता आरोपीने अंगठी बदलल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सराफा दुकानदाराने तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  


पोलिसांची जलद कारवाई

तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता कलम ३०३, ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शोध पथकाने तत्काळ तपास सुरू केला व अवघ्या दोन तासांत आरोपी हमझा अब्दुल वाहिद शेख (३०, राहणार अरविंद नगर, चंद्रपूर) याला अटक केली.  

हमझा शेख हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  


मुद्देमाल जप्त 

गुन्ह्यात चोरीस गेलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या:  

- सोन्याची अंगठी – ३.०१० ग्रॅम (किंमत ₹३५,०००)  

- ३.०१० ग्रॅम सोने – (किंमत ₹३०,०००)  

- गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल

- एकूण मुद्देमाल: ₹१,३०,०००  


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  


परिविक्षाधीन पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे व विक्रम मेश्राम यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.  


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व

या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांसह सर्व नागरिकांनी आपल्या घरी व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळेच आरोपी अवघ्या दोन तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकला, त्यामुळे सुरक्षेसाठी सर्वांनी त्याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने