google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc क्रूर वडीलाने मुलांच्या जेवणात टाकले विष

क्रूर वडीलाने मुलांच्या जेवणात टाकले विष

Crime story's
नागपूर - पत्नीसोबत सुरू असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी पतीने आपल्या मुलांच्या जेवणात विष टाकत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. Crime news

45 वर्षीय मनोज अशोक बेले यांचे पत्नी प्रियासोबत नेहमी वाद व्हायचे, मेकॅनिक असलेल्या मनोज ला वर्षभरापासून दारूचे व्यसन जडले होते, त्यामुळे मुलांवर याचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी पत्नी प्रिया मनोज पासून वेगळी राहायला गेली. cruel father
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मनोज ने मुलगी तनिष्का व मुलगा प्रिन्स चा वाढदिवस साजरा केला होता, सततच्या वादात पती-पत्नीमध्ये समझोता झाला, मुले आईजवळ तर मनोज हा एकटा रहायचा, दोन्ही मुले दर रविवारी वडील मनोज कडे जायचे. Nagpur crime
रविवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी आजोबाने दोन्ही मुलांना मनोज कडे सोडले, मात्र बापाच्या डोक्यात सैतान शिरला होता, मनोजने दोन्ही मुलांना खाऊ दिले त्यांनतर त्यांच्या जेवणात विष टाकले, ह्या प्रकारानंतर सुद्धा मनोज ने दोन्ही मुलांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. Maharashtra crime news
दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच मनोजने गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेत 7 वर्षीय तनिष्काचा मृत्यू झाला तर 12 वर्षीय प्रिन्स हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने