google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc chandrapur crime । अट्टल दुचाकी वाहन चोराला रामनगर पोलिसांनी केली अटक

chandrapur crime । अट्टल दुचाकी वाहन चोराला रामनगर पोलिसांनी केली अटक

chandrapur crime

 chandrapur crime : मागील काही दिवसापासून चंद्रपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, गुन्हेगारी नियंत्रणात यावी यासाठी चंद्रपूर पोलीस दल प्रयत्नरत आहे. वाढलेल्या गुन्ह्यात दुचाकी वाहन चोरीच्या घटना पोलिसांसमोर आव्हान निर्माण करीत असून रामनगर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोराला २१ जानेवारीला अटक करीत आरोपीकडून तब्बल ९ दुचाकी जप्त केल्या.

रामनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना सदर गुन्हा व इतर गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपीबाबत माहिती मिळाली. मात्र आरोपी हा आपला ठावठिकाणा नेहमी बदलत असल्याने पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता.

२१ जानेवारीला रामनगर गुन्हे शोध पथकाने ३३ वर्षीय कपिल प्रभू मेश्राम राहणार फुकटनगर चंद्रपूर याला अटक केली, आरोपीची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी आरोपीला विश्वासात घेत कसून चौकशी केल्यावर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
आरोपी कपिल मेश्राम ने चंद्रपूर शहर, भद्रावती, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकूण ९ दुचाकी वाहन चोरी केले होते. आरोपीकडून दुचाकी जप्त करीत एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सपोनि हनुमान उगले, पोलीस कर्मचारी आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, शरद कुडे, अमोल गिरडकर, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने