Crime story's
चंद्रपूर - शहरात मागील अनेक दिवसांपासून चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे मात्र चोरांच्या नवनवीन युक्त्यांवर चंद्रपूर पोलिस पाणी फेरत आहे.
Chandrapur crime news
Chandrapur crime news
शहरातील आदर्श पेट्रोल पंप समोर राहणारे पियुष जैन हे आपल्या घरासमोर गाडी पार्क केली होती, मात्र सकाळी कार क्रमांक MH34mm9693 त्याठिकाणी आढळली नाही, जैन यांनी आजूबाजूच्या परिसरात कार शोधली मात्र ती कुठे ही न आढळल्याने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे व चमू यांनी तपास सुरू केला. Chandrapur police
पोलिसांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर व खबरी नेटवर्क ला ऍक्टिव्ह करीत अवघ्या काही तासात आरोपी शांतीनगर येथे राहणारा 34 वर्षीय सुखरंजन चित्तरंजन खैराती याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. Maharashtra crime news
गुन्हे शोध पथकाने चोरी गेलेले चारचाकी वाहन किंमत 4 लाख 50 हजार आरोपिकडून जप्त केले.
दुसऱ्या गुन्ह्यात शहरातील छत्रपती नगर येथे राहणारे 60 वर्षीय पुंडलिक फकिराजी राणे 11 जानेवारीला घराला कुलूप लावत कुटुंबासाहित बाहेर फिरायला गेले होते.
परत आल्यावर घराला लावले असलेले कुलूप तुटल्या अवस्थेत होते, आत जाऊन बघितले तर घरातील सामान अस्तव्यस्त होते, व हॉल मध्ये लावलेला सॅमसंग कंपनीचा 32 इंच चा led टीव्ही त्याठिकाणी नव्हता.
16 जानेवारीला राणे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविली, रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा गुन्हा उघडकीस यावा यासाठी तपास सुरू केला.
खबरी नेटवर्क ची मदत घेत पोलिसांनी डिस्पेन्सरी चौक, रयतवारी कॉलरी येथे राहणारा 22 वर्षीय महेश रामलू दांगमवार याला अटक करीत चोरी गेलेला टीव्ही किंमत 30 हजार जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, महेश सामलवार व गुन्हे शोध पथकातील चमूने पार पाडली.
