Crimestorys
नांदेड - प्रॉपर्टीच्या वादातून आज सोमवारी नायब तहसीलदार यांच्यावर ग्रामसेवकाने धारदार शस्त्राने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
भोकर शहरातील देशपांडे गल्लीत हा रक्तरंजित थरार घडला, शेजाऱ्यांनी हा सर्व प्रकार बघताच आरोपी ग्रामसेवकाला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. Assault
भोकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील रेखा चामणार या नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे, आरोपी ग्रामसेवक बालाजी नारायण हाके हे नायब तहसिलदार यांचे भाऊजी लागतात, अनेक दिवसांपासून दोघांमध्ये प्रॉपर्टीचा वाद सुरू होता. Nanded crime
आज सकाळी रेखा चामणार या ऑफिसमध्ये जाण्यासाठी घरून निघत असतात बालाजी हाके त्यावेळी घरी आले, त्याने अचानक रेखा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. Maharashtra crime
पुन्हा वार करायला गेलेल्या ग्रामसेवकाला शेजाऱ्यांनी पकडले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, रेखा चामणार यांच्या तक्रारीवरून ग्रामसेवक हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
