google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc उद्धव शिंदे यांच्या त्रासामुळे तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

उद्धव शिंदे यांच्या त्रासामुळे तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Crimestorys
नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही-पिंपळगावात राहणाऱ्या तरुणीने छेडखाणीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. Nanded crime
गावात राहणाऱ्या तरुणीला उद्धव भाऊराव शिंदे हा नेहमीच वाटेत छेडायचा, वारंवार तिला बघून अश्लील इशारे करीत होता, सतत तो अर्वाच्य भाषेत त्या तरुणीला शिवीगाळ करीत असे.
आधी त्या तरुणीने याकडे दुर्लक्ष केले मात्र त्यानंतर उद्धव ने त्रास देणे थांबविले नाही, त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सदर बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली, तरुणीचे वडील सरळ उद्धव च्या घरी दाखल झाले व उध्दवच्या या प्रकाराची माहिती त्याच्या आई-वडिलांना दिली. Molested
त्यानंतर सुद्धा उध्दवने त्रास देणे बंद केले नाही, छेडखानी व सतत अश्लील शब्दात उद्धव च्या बोलण्यामुळे गावात आपली बदनामी होईल या भितीपोटी त्या तरुणीने आज सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. Maharashtra crime news
तरुणीच्या वडिलांनी उद्धव च्या विरोधात मुदखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी उद्धव शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने