Crime story's
पुणे - विवाहित जोडप्याला मूल-बाळ होत नसल्याने पूजा, उपास असे विविध प्रकार आपण बघितले असतीलचं मात्र पुण्यातील धायरी भागात संगणक अभियंता असलेल्या एकाने मूल न झाल्याने पत्नीवर अघोरी प्रकार केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.
संगणक अभियंता जयेश याचा विवाह थाटामाटात झाला होता, मात्र त्यानंतर मूल बाळ न झाल्याने विवाहितेचा छळ सुरू करण्यात आला. Cemetery
अमावस्या आली की सासरचे मंडळी काळे कपडे घालून एकत्र बसायचे, त्यानंतर तळघरातील खोलीत अघोरी पूजा करायचे. witchcraft
त्यानंतर सासरच्या मंडळींनी हद्दच केली, एकेदिवशी घराजवळ असलेल्या स्मशानभूमीत नेत तिथली राख व जळालेली हाड जमा केले, त्यानंतर हाडांची पूजा करीत राख पाण्यात टाकून विवाहितेला पिण्यासाठी बळजबरी केली. Pune crime news
त्यानंतर नातेवाईक यांचेकडे विवाहितेला नेण्यात आले असता त्याठिकाणी मांत्रिकाला बोलाविण्यात आले होते, मृतांची हाड, केस, घुबडाचे पाय, कोंबड्यांचे मुंडके असे त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. Aghori Puja
हाडांची पावडर बनवीत विवाहितेला पिण्यासाठी दिले मात्र तिने नकार देताचं पिस्तुलचा धाक दाखविण्यात आला.
या सर्व प्रकाराला कंटाळून विवाहितेने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली, विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहे.
