Crime storys
वर्धा - नागपूर , अमरावती मार्गावर असलेल्या सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी एका अनोळख्या महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला होता, त्या महिलेच्या मर्डर मिस्ट्री प्रकरणात पोलिसांना अखेर यश मिळालं असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Wardha crime
35 दिवसांपूर्वी एकाला सत्याग्रही घाटात अर्धवट जळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता, पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र कसलाही पुरावा नसल्याने पोलिसांपुढे प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एक आव्हान उभे राहिले.
पोलिसांनी वर्धा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांच्या प्रकरणांची पडताळणी केली. Murder
प्रकरण लवकर उलगडीस व्हावे यासाठी तब्बल 3 हजार हुन अधिक बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात आला, महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंप, दुकाने आधीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले मात्र हाती काही लागले नाही, पोलिसांजवळ फक्त दागिने, जळलेली साडी व त्या महिलेच्या चप्पल होत्या, मात्र बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबाने 5 डिसेंम्बर रोजी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती, त्या महिलेचे नाव ज्योत्स्ना भोसले असे होते. Blind murder mystery
पोलिसांनी तपासाला वेग दिला व मृत महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
महिलेचा पती मनीष भोसले याला पत्नी ज्योस्तना च्या चारित्र्यावर संशय होता.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता या कारणावरून त्याने आपला मित्र प्रवीण पवार यांच्या मदतीने तिची हत्या केली, मृतक महिलेचा चेहरा कुणी ओळखू नये यासाठी आधी दगडाने चेहरा ठेचला त्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. Maharashtra crime news
पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 19 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
