google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकला मांजा

बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकला मांजा

Crime story's
ठाणे/मुंबई - राज्यात चायनीज नायलॉन मांजावर प्रतिबंध असताना सुद्धा सर्रासपणे सदर मांजा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे, या मांज्यामुळे नागरिकांचे गळे कापले जात असून अनेकांनी यामध्ये आपला जीव सुद्धा गमावला आहे. Nylon manja

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने त्याचा गळा चिरला यामध्ये दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उल्हासनगर येथे राहणारे 47 वर्षीय संजय हजारे असे मृतकाचे नाव आहे. Chinese manja
मकरसंक्रांत च्या दिवशी भिवंडी वरून कामे आटोपत ते घराच्या दिशेने निघाले होते, उड्डाणपुलावर पोहचताच अचानकपणे पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला, त्या मांजाने हजारे यांचा गळा कापला गेला, दुचाकीवरून नियंत्रण सुटत रस्त्याच्या कडेला ती दुचाकी आपटली.
या घटनेत हजारे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने