Chandrapur crime update
चंद्रपूर - जुनी ओळख दाखवीत वयोवृद्ध महिलेच्या घरी जाऊन सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली, शहर पोलिसांनी या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील सुनीता नामक महिलेला अटक केली आहे.
12 ऑक्टोबर ला प्रकाश नगर महाकाली कॉलरी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय रमाबाई लोहकरे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की सुनीता नामक अनोळख्या महिलेने जुनी ओळख दाखवीत फिर्यादीच्या आईच्या घरी जात उशाखाली ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण 21 हजार 375 रुपयांचा मालावर हात साफ करीत पळ काढला.
फिर्यादीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सुनीता चा शोध घेण्याकरिता पथक तयार केले, पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कानगाव/नांदगाव येथून 38 वर्षीय संगीता उर्फ सुनीता मारोती अलोने ला ताब्यात घेतले, चोरी प्रकरणाबाबत चौकशी केली असता तिने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले, पोलिसांनी सुनीता जवळून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मंगेश भोंगाळे, पोउपनी शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, चेतन गज्जलवार, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे, सुमित बरडे, संतोष कावळे व विशाल बगडे यांनी केली.
