google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Chandrapur Burglary : चंद्रपुरात केबल चालकाच्या घरी घरफोडी

Chandrapur Burglary : चंद्रपुरात केबल चालकाच्या घरी घरफोडी

 Chandrapur Burglary चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथे आंबेडकर चौक वार्ड क्रमांक 2 मधील केबल चालक दिलीप ढोक यांच्या घरी धाडसी घरफोडी अज्ञातांनी केल्याची बाब 6 सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

Burglary


केबल चालक यांचा मुलगा जागृत ची प्रकृती 2 सप्टेंबर रोजी बिघडल्याने त्याला तात्काळ डॉ.खान यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मुलावर उपचार सुरू असताना वडील व आई हे दवाखान्यात मुलाजवळ थांबत होते.

Chandrapur burglary 5 सप्टेंबर च्या रात्री केबल चालक दिलीप ढोक यांनी आपली कामे आटोपून रात्री दवाखान्यात गेले, दुसऱ्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी ढोक घरी आले असता त्यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त परिस्थितीत आढळले.

घराच्या मुख्य प्रवेशदाराचे कुलूप तोडून अज्ञाताने आत प्रवेश करीत कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 67 हजार 685 रुपयांचा माल चोरून नेला.

याबाबत ढोक यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली, तक्रार मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने