google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Badlapur : चंद्रपुरात घडलं बदलापूर

Badlapur : चंद्रपुरात घडलं बदलापूर

 Badlapur कोरपना : उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे.

Badlapur


राज्यातील बदलापूर येथे शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्य हादरून गेले होते, पोलीस विभागाने आरोपीचे एन्काऊंटर केले असले तरी सुद्धा असे प्रकार कमी होताना दिसत नाही आहे.


अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता. यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. जर ही बाब कुणाला सांगशील तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकणार अशी धमकी शिक्षक अमोल लोडे यांनी पीडितेला दिली होती, भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. Badlapur

पीडित मुलीने ही बाब मैत्रिणीला सांगितली नंतर पीडितेच्या मैत्रिणीने आईला सांगितली आणि हे प्रकरण उघडकीस आले.


दरम्यान, मंगळवारी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कोरपना शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी दिली. आणखी असे प्रकार संबंधित शिक्षकाने केल्याची माहिती तपासात उजेडात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सदर प्रकरणात कुणी पीडित असेल त्यांनी समोर येत तक्रार करावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने