Liquor smuggling विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली, मात्र या आचारसंहितेमध्ये अवैध धंदे करणारे सुसाट काम करीत आहे, असेच एक सुसाट कामाचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला.
Liquor smuggling 15 ऑक्टोबर पासून राज्यसहित चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे, या काळात अवैध धंद्यावर लगाम लावण्याचे काम चंद्रपूर पोलिसांतर्फे सुरू आहे.
महत्त्वाचे : जुन्या वादातून तिघांनी केली एकाची हत्या, चंद्रपुरात खुनी थरार
17 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मुखबिर मार्फत माहिती मिळाली की सुशी जानाळा मार्गावर अवैध दारूची वाहतूक होणार आहे, माहितीच्या आधारे पोलिसांनी सुशी मार्गावर नाकाबंदी केली, त्यावेळी चारचाकी वाहन संशयास्पद स्थितीत येताना दिसले असता त्या वाहनाला थांबवित झडती घेण्यात आली, त्यामध्ये देशी दारूच्या 10 पेट्या हजार नग 90ml मिळून आल्या, दारू व वाहनाची एकूण किंमत 5 लाख 35 हजार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी देवानंद बुरांडे, राहणार सुशी, मूल विरुद्ध पो.स्टे.मुल येथे अपराध क्रमांक 388/2024 कलम 65 (अ )म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
