google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Inveterate criminal : चंद्रपुरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

Inveterate criminal : चंद्रपुरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

 Inveterate criminal चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलीस दलातर्फे कठोर कारवाई करण्यात येत आहे, शहरातील दुर्गापूर भागात राहणारा 23 वर्षीय अमोल आदेश ईलमकर ला 1 वर्षाकरिता चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Inveterate criminal


 Inveterate criminal आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात येत असून वर्षभरात 4 गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

समतानगर येथे राहणारा अमोल इलमकर वर एकूण 20 गुन्हे दाखल आहे, ज्यामध्ये दुर्गापूर, रामनगर, बल्लारपूर व घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दुखापत, शस्त्र अधिनियम असे अनेक गुन्हे अमोल वर दाखल आहे.


दुर्गापूर भागात अमोल ची दहशत आहे, पोलिसांनी अमोल वर वारंवार प्रतिबंधक कारवाई केल्यावर सुद्धा तो जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत दखल घेत विघातक कृत्याना प्रतिबंध अधिनियम 1981 अनव्ये प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकारी गौडा यांच्याकडे पाठविण्यात आला.
सदर प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी अमोल आदेश ईलमकर ला 1 वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश 3 ऑक्टोबर रोजी पारित करण्यात आला. Inveterate criminal

मात्र अमोल हद्दपार असल्याने त्याचा शोध घेऊन 5 ऑक्टोबर रोजी त्याला ताब्यात घेत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे अमोल चा सख्खा भाऊ रोहित ईलमकर वर सुद्धा यापूर्वी 1 वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने