google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc live cartridges : बाबूपेठ भागात 6 जिवंत बुलेट जप्त

live cartridges : बाबूपेठ भागात 6 जिवंत बुलेट जप्त

 live cartridges चंद्रपूर विधानसभा निवडणुकीच्या काळात चंद्रपूर पोलीस दल कारवाई मोहीम राबवित आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी आतापर्यंत हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधित कारवाई केली असून या श्रुंखलेत अवैध दारू, शस्त्र अश्या विविध कारवाया केल्या आहे.

live cartridges


विशेष बाब म्हणजे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आज जिवंत पितळी धातूच्या बुलेट जप्त केल्या. live cartridges

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने बाबूपेठ येथील 30 वर्षीय कुणाल मनीष कातकर यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता त्याठिकाणी 6 जिवंत पितळी धातूच्या बुलेट किंमत 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कुणाल कातकर ला यावेळी अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि निलेश वाघमारे, पोउपनी संदीप बच्छीरे, महेंद्र बेसरकर, सचिन बोरकर, संतोष कणकम, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, संतोष कावळे, शाहबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, इर्शाद शेख, संतोष राठोड व भावना रामटेके यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने