Crime story's
परभणी - जुन्या भांडणाचा राग मनात धरून 3 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्या बालकाची हत्या केल्यावर त्याचा मृतदेह फरशी खाली पुरला.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सिद्धेश्वर परिसरात राहणाऱ्या गणेश भीमराव धोत्रे यांनी ताडकलस पोलीस ठाण्यात 3 वर्षीय गोविंद गणेश धोत्रे याच अपहरण केल्याची फिर्याद दिली. Parbhani crime
तक्रारीची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला, पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा यांनी 4 पथके बनवीत गोविंद याच्या शोधात रवाना केले. Maharashtra crime news
अपहत बालक बद्दल पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की त्या बालकाची हत्या शेजारी राहणाऱ्यानी केली आहे.
पोलिसांनी तात्काळ कावेरी बनहर ला ताब्यात घेत चौकशी केली असता गोविंद ची हत्या केल्याची बाब कबूल केली. Murder
जुन्या भांडणाचा राग मनात धरून कावेरी आणि सासू अन्नपूर्णा यांनी अंगणात खेळत असलेल्या गोविंद ला उचलत त्याची हत्या केली, त्यानंतर गोविंद चा मृतदेह घरातील कोपऱ्यात पुरले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करीत तहसीलदार यांच्या उपस्थितीत गोविंद चा मृतदेह बाहेर काढला.
आरोपी महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
