Crime story's प्रशांत गेडाम
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील मौजा मिनघरी, येथे बनावट देशी दारूचा साठा असल्याची खात्रीदायक बातमी राज्य उत्पादन शुल्क विभाग वरोरा यांना प्राप्त झाली. Crime news
राज्य उत्पादन शुल्क वरोरा यांनी 17 जानेवारी रोजी पहाटे सदर ठिकाणी अचानक छापा मारला असता उमाजी चंद्रहास झोडे या इसमाचे चारचाकी वाहनात तब्बल नाईंटी क्षमतेच्या रॉकेट ब्रँड च्या 1000 बाटल्या आढळून आल्या. सदर आरोपीला ताब्यात घेऊन संपूर्ण दारूसाठा व त्यासाठी वापरलेली मारुती कंपनीची रिट्स कार असा एकूण 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Duplicate alcohol in chandrapur
वरील दारूसाठा कुठून आणण्यात आला याबाबत आरोपीला विचारणा केली असता त्याने चंद्रपूर शहरातील एका इसमाचे नाव सांगितले त्यावरून चंद्रपूर तपास कामी वरोरा पथक गेले असता मुख्य आरोपी फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. Chandrapur crime
या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावटी दारूच्या मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून, त्यामुळे मोठे मासे फसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Exice department chandrapur
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सदर कारवाई विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क मोहन वर्दे, नागपूर विभाग अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वरोरा संजय आकेवार, दुय्यम निबंधक चंदन भगत, सहायक दुय्यम निरीक्षक उमेश झुबांडे, किशोर पेदुजवार, सुजित चिकाटे, दिलदार रायपुरे व वाहन चालक यांनी पार पाडले. Maharashtra crime
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास थोरात करीत आहेत.
