google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc 10 महिन्यांपूर्वी घडलेल्या जबरी चोरीचा चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

10 महिन्यांपूर्वी घडलेल्या जबरी चोरीचा चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

Crimestorys
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यावरून दोघेजण महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीची वसुलीची रक्कम घेऊन येत असताना अज्ञातांनी त्यांच्याजवळ असलेली रोख 18 लाख 93 हजार 520 रुपयांची रक्कम त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करीत त्याच्याजवळून पळ काढला. Chandrapur police
10 महिन्यांपूर्वी घडलेल्या या लुटमारीचा घटनेचा उलगडा जानेवारी 2023 मध्ये झाला असून या प्रकरणी 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अटक केली आहे. Robbery
16 मार्च 2022 रोजी महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या 33 वर्षीय दिनेश चलाख व 27 वर्षीय अक्षय गोवर्धन हे दुकानाची विविध भागातून वसुली करून परत मूल कडे येत असताना जाणाळा मार्गावरील डोनी फाट्याजवळ अज्ञात दोघांनी त्यांची दुचाकी खाली पाडत दोघांना मारहाण केली व त्यांच्याजवळ वसुलीची रोख रक्कम घेऊन पळाले. Lcb chandrapur
याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती, पोलिसांना याप्रकरणी यश न मिळाल्याने सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतल्यावर सदर गुन्ह्याचा नव्याने तपास सुरू करण्यात आला. Chandrapur crime
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.
याप्रकरणी मूल पोलिसांनी काय तपास केला, कुणाची साक्ष नोंदविली, संशयित कोण याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
सदर माहिती जाणून घेत असताना या गुन्ह्यातील संशयित 23 वर्षीय केतन अशोक बुटले व 24 वर्षीय तोहीद आरिफ शेख दोघेही राहणार मूल यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.
तब्बल 8 महिने संशयित आरोपीनी चोरी केलेला पैसा बाहेर काढला नाही, त्यानंतर त्यांनी चोरीच्या पैश्यानी जुनी वापरते चारचाकी वाहन क्रमांक MH40AC6354 किंमत 4 लाख, एक बुलेट दुचाकी किंमत 2 लाख 25 हजार व एक मारोती चारचाकी वाहन किंमत 1 लाख खरेदी केले होते.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने दोन आरोपींना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी 10 महिन्यांपूर्वी वाटमारी चा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
मात्र ही वाटमारी अचानक घडली कशी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असता महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी मध्ये याआधी एकजण वसुलीचे काम करायचा, मात्र त्याला कामावरून कमी केल्याने त्याने वसुली रकमेची टीप दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या वाटमारीचा मुख्य सूत्रधार फरार झाला असून पोलिसांची चमू अजूनही त्याच्या मागावर आहे.
सदर प्रकरणाची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, नितीन साळवे, प्रकाश बलकी, प्रमोद डंबारे, सुभाष गोहोकार, सतीश बगमारे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने