Crimestorys
मध्यप्रदेश - रतलाम येथे कौटुंबिक कलहातून एकाने आपलं अख्ख कुटूंबच संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. Tripal murder case in india today
आरोपीच्या घरातील सदस्य मागील 2 महिन्यापासून शेजाऱ्यांना दिसले नसल्याने त्यांनी संशय व्यक्त करीत पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.
पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता आरोपीने पत्नी, 7 वर्षाचा मुलगा व 4 वर्षाच्या मुलींची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली, त्यानंतर त्यांचे मृतदेह घरातच पुरले. india crime news
विशेष म्हणजे आरोपीने 2 महिन्यांपूर्वी तिघांना ठार केले होते, रविवारी पोलीस व प्रशासनाच्या उपस्थितीत तिघांचे मृतदेह घरातून बाहेर काढले.
फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविले आहे.
