Crimestorys
चंद्रपूर - 15 ऑगस्ट 2022 ला चंद्रपुरातील तुकुम परिसरातून प्रदीप गंगमवार व राजेश झाडे यांचं 4 जणांनी शस्त्राचा धाक दाखवीत अपहरण केलं होतं, त्यांनी दोघांच्या सुटकेसाठी 3 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागितली होती. Ransom6 महिन्यांपूर्वी घडलेल्या अपहरण प्रकरणातील शेवटचा आरोपी नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे.
प्रदीप गंगमवार व राजेश झाडे यांना जुगार खेळण्याची अतिसवय असल्याने आरोपी सरताज हाफिज यांची ओळख झाली, हाफिज ने 15 ऑगस्टला जुगार खेळण्याच्या उद्देशाने दोघांना बाहेर बोलाविले असता तुकुम परिसरात गाडी थांबविली मात्र त्यावेळी अज्ञात चौघांनी गाडीत प्रवेश करीत दोघांचे शस्त्राच्या धाक दाखवीत अपहरण केले. Kidnapping
मूल मार्गाने आरोपीनी वाहन नेत सरळ नागपूर गाठले, नागपूरला पोहचल्यावर एका आरोपीला सिगारेट पिण्याची तलब आली आणि त्या क्षणी गंगमवार व राजेश झाडे यांनी आरडाओरडा करीत पळ काढला. ipl bookee
अपहरण प्रकरणी 4 आरोपींचा सहभाग होता त्यांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांनी विविध पथके तयार केली होती.
पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी 3 आरोपींना अटक केली, मात्र यामधील ललित मोहाडीकर हा आरोपी पसार झाला. Chandrapur crime
याबाबत चंद्रपुरातील दुर्गापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
6 महिन्यानंतर आरोपी मोहाडीकर हा नागपूर पोलिसांच्या हाती लागला, त्याच्यावर 15 मे 2022 ला नागपूर येथील बार मध्ये स्टाफ सोबत मारहाण करण्यात आली होती, त्यामध्ये मोहाडीकर याचा सहभाग होता. Maharashtra crime news
याप्रकरणात आरोपी मोहम्मद सरताज हाफिज बिनबा गेट चंद्रपूर, नागपूर येथील शेख नूर शेख इस्माईल व अजय पुनमलाल गौर व ललित मोहाडीकर या आरोपींचा समावेश होता.
पोलीस मोहाडीकर याच्या शोधात असताना शनिवारी रात्री मोहाडीकर गुन्हे शाखेच्या चमू ला गवसला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
