google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

Crimestorys
पुणे - मोक्का व खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार केला, नशीब बलवत्तर म्हणून ठिगळे हल्ल्यातून बचावले. Mns adhikrut
Fire on mns district president
मागील वर्षी एप्रिलमध्ये ठिगळे यांची पुणेच्या मनसे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे मिळाली होती, ठिगळे यांना गंभीर गुन्ह्यातील आरोपी मिलिंद जगदाळे व मयूर जगदाळे यांनी खंडणीची मागणी केली होती.
मात्र त्यांची मागणी ठिगळे यांनी फेटाळल्याने आम्ही खेड चे भाई आहोत, थांब तुला संपवितो अशी धमकी त्यांनी ठिगळे यांना दिली होती.
शनिवारी रात्री ठिगळे यांच्या घरासमोर जगदाळे यांनी तुला माज आलाय अशी धमकी देत छातीवर पिस्तुल ठेवत गोळी झाडली मात्र नशीब बलवत्तर म्हणून पिस्तुल मधून गोळी निघाली नाही, त्यांनतर आरोपीनी ठिगळे यांना घाबरविण्यासाठी हवेत गोळी झाडली. Pune firing news
या प्रकरणी राजगुरूनगर पोलिसांनी मिलिंद व मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला व शस्त्राचा वापर आणि खंडणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune crime news
गुन्हा दाखल झाल्यावर दोन्ही आरोपी फरार झाले आहे, मात्र ठिगळे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने