Chandrapur lcb आदर्श आचारसंहिता लागू असताना स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे, आतापर्यंत अवैध दारू, शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
Chandrapur lcb कारवाईच्या या मोहिमेत 17 नोव्हेंबर ला स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात लाखोंचा साठा पकडला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस स्टेशन भिसी हद्दीत चारचाकी वाहनातून सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे टाटा हरिअर वाहन क्रमांक MH 44 S 3838 चा पाठलाग केला असता सदर वाहन एका स्थळी थांबवित वाहन चालक पसार झाला.
वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये इगल सुगंधित तंबाखू 400 ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 105 पाकीट एकूण 42 किलो किं. 56700/_ रु., इगल सुगंधित तंबाखू ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 75 पाकीट एकूण 75 किलो किं. 1,12,500/_ रु., होला सुगंधित तंबाखू 1000 ग्रॅम चे एक पाकीट असे एकूण 155 पाकीट एकूण 155 किलो किं. 1,27,100/_ रु., पान पराग प्रीमियम मसाला एकूण 80 पाकीट एकूण 8 किलो किं. 10,240/_ रु., टाटा Harrier वाहन क्र. MH 44 S 3838 किमत असा एकूण 15,00,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur lcb
पोलिस स्टेशन भीसी येथे अपराध क्र. /24 कलम 223, 275 भा. ना. सं. सहकलम 30(2), 26(2)(अ), 3, 4, 59(1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे अज्ञात वाहन चालक याचे विरुद्ध गून्हा नोंद केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बलराम झाडोकार, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा सुरेंद्र महतो,पो हवा संजय वाढई,पोहवा गणेश मोहुर्ले,पो अं , प्रमोद कोटणाके यांनी केली.
