google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Chandrapur sand mafia | अवैध रेती वाहतूक प्रकरणी २२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

Chandrapur sand mafia | अवैध रेती वाहतूक प्रकरणी २२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

 Chandrapur sand mafia : विरूर, १४ फेब्रुवारी २०२४ – विरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक आणि मालकावर कारवाई करत एकूण २२,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेचा भाग असून, गेल्या आठवडाभरात पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.

Chandrapur sand mafia


कारवाईचे तपशील:

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विरूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पथकाने कारवाई केली. संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता, कोणतेही अधिकृत परवाने नसताना मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जात असल्याचे आढळले. त्यानंतर सदर ट्रक जप्त करण्यात आला आणि दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही च्या मदतीने 2 तासात आरोपीना अटक, शहर पोलिसांची कारवाई

आरोपींची नावे:

१) प्रफुल श्यामराव गेडेकर (वय ३३ वर्षे), व्यवसाय – चालक, रा. नगराळा, ता. जिवती, जि. चंद्रपूर.
२) आनंद माधवराव ढगे (वय ४० वर्षे), व्यवसाय – मालक, रा. कोरपना, जि. चंद्रपूर.

आयोग्य कायदेशीर कारवाई:

विरूर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक १५/२५ नोंदवण्यात आला असून, कलम ३०३ (२) भारतीय दंड संहिता व कलम १७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालकाला पुढील कार्यवाहीसाठी विरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची सातत्यपूर्ण मोहीम:

गेल्या आठवड्याभरात स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेअंतर्गत वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक रोखण्यात यश आले आहे. प्रशासनानेही याबाबत सतर्क राहून संबंधित विभागांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी:

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, यामध्ये पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जयंता चुनारकर, नापोशी संतोष येलपुलवार, पोशी गोपाल अटकुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे, गणेश भोयर (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने