Chandrapur burglary : चंद्रपूर - चंद्रपूर घरफोडी सारखे गुन्हे करीत शहरात फिरणाऱ्या ३ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतले आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक ३ जानेवारीला पेट्रोलिंग करीत होते त्या दरम्यान त्यांना माहिती मिळाली कि घरफोडी करून काही इसम हे रय्यतवारी कॉलरी परिसरात संशयास्पद रित्या फिरत आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने यावेळी ३४ वर्षीय राकेश सुब्रमण्यम सानिपती राहणार तेलुगू शाळेजवळ रय्यतवारी कॉलोरी, ३२ वर्षीय बिश्वजीत बिमल सरकार राहणार बंगाली कॅम्प व २१ वर्षीय दीपक राजू भोले राहणार शांतीनगर बंगाली कॅम्प यांना ताब्यात घेतले. Chandrapur burglary
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि यापूर्वी भद्रावती व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चा गुन्हा केला आहे. घरफोडी केल्यावर सोन्या-चांदीचे दागिन्यांची विल्हेवाट कशी लावत होते याबाबत आरोपीं म्हणाले कि सराफा सोनार मनोज पवार यांना आम्ही चोरीचे दागिने विकत होतो.
चंद्रपुरात गांजाचे सेवन करताना तीन युवकांना अटक
सराफा दुकानदार व इतर आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील रामनगर, दुर्गापूर व शहर पोलीस स्टेशनमध्ये तिन्ही आरोपीवर चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असून आरोपीना रामनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी सतीश अवथरे, संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.
Chandrapur Burglary: Three Accused Arrested by Crime Branch
The Chandrapur Crime Branch has arrested three individuals involved in multiple burglary cases in the city. The arrests took place on January 3 when the crime branch team was patrolling in the Ramnagar police station limits. Acting on a tip-off, they detained three suspects roaming suspiciously in the Rayyatwari Colliery area after committing a burglary.
The arrested individuals are identified as:
- Rakesh Subramaniam Sanipati (34) – Resident of Rayyatwari Colliery, near Telugu School
- Biswajit Bimal Sarkar (32) – Resident of Bengali Camp
- Deepak Raju Bhole (21) – Resident of Shantinagar, Bengali Camp
During interrogation, the accused admitted to being involved in burglary cases in Bhadrawati and Ramnagar police station areas. They also revealed that they sold stolen gold and silver ornaments to jeweler Manoj Pawar.
