Ganja Smoking : चंद्रपूर शहरात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे, मात्र या अंमली पदार्थाची तस्करी करणारा मुख्य म्होरक्या कोण आहे हि बाब अद्यापही पुढे आली नाही. शहरातील काही भागात अल्पवयीन व तरुण मुले गांजा विक्री मध्ये लिप्त आहे.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने तीन युवकांना गांजा चिलम चे सेवन करताना अटक केली आहे. बाबुपेठ गार्डन व कामगार चौक परिसरात चिलम मध्ये गांजा भरून सेवन करीत असताना २४ वर्षीय आदित्य संजय पाटील, २९ वर्षीय महेंद्र राजेंद्र मोरे, ३२ वर्षीय क्रिष्णकुमार रामपाल तिवारी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम २७ एनडीपीएस ऍक्ट नुसार वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे.
चंद्रपुरात MD जप्त
सदर युवकांनी अंमली पदार्थ गांजा कुठून आणला याबाबत सध्या तरी समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. युवकांनी योग्य माहिती दिल्यास पोलिसांचा पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होणार.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनि मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी सुरेंद्र महतो, सतीश अवथरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, प्रमोद कोटनाके, मिलिंद टेकाम यांनी केली.
पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थ खरेदी विक्री व सेवन बाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथे टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
