Chandrapur drug bust : दारूबंदी काळात चंद्रपूर जिल्ह्यात नशा करण्याकरिता इतर पर्याय शोधण्यात आले, त्यामध्ये गांजा व एमडी पावडर अश्या अंमली पदार्थाचा समावेश होता. दारूबंदी उठल्यानंतर अंमली पदार्थाची चव व्यसनाधीन इसमांच्या जिभेवरून गेली नाही.
आता चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने 3 युवकांना एमडी पावडरची तस्करी करताना अटक केली आहे, हे अंमली पदार्थ चंद्रपुरात कुठून आलं यावर पोलिसांनी कसून चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाळू तस्करीत 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह सुरू होता तर दुसरीकडे काहींनी याचा फायदा उचलत अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी शहरात मार्गक्रमण करीत होते. Chandrapur crime news
रयतवारी परिसरातील निम वाटीका येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत चारचाकी वाहन क्रमांक MH34 BV 4447 ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 23.46 ग्राम एमडी मॅफेड्रोन पावडर किंमत 1 लाख 40 हजार 760 व चारचाकी वाहन असा एकूण 9 लाख 40 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर मॅफेड्रोन पावडर हे रयतवारी परिसरात विक्री करण्यासाठी आरोपी घेऊन जात होते मात्र त्यापूर्वी पोलिसांनी त्यांचा अंमली पदार्थ विक्री करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी 28 वर्षीय मालू उर्फ नसीब आरिफ खान, रा. रझा चौक बगळखिडकी, 32 वर्षीय दीपक अशोककुमार आसवानी, रा.सिंधी कॉलोनी रामनगर व 22 वर्षीय जमिर शाबीर शेख राहणार बगळखिडकी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, पोउपनी सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार, दिनेश अराडे यांनी केली.
