Son Kills Father Over Dispute | Shocking Murder Case in Maharashtra"
Murder Case in Brahmapuri : जवळच असलेल्या मौजा बरड किन्ही येथील नामदेव लक्ष्मण गडे यांचा मुलगा होमराज नामदेव गडे यांनी दिनांक 11.2.2025 ला रात्र दहा वाजताच्या सुमारास आपल्या वडिलांचा खून केला व त्यांनी खून करण्यासाठी वापरलेले काठी तसेच रक्ताने भरलेले कपडे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे,
सदर प्रकरणाची हकीकत याप्रमाणे आहे की दिनांक 11/ 2/ 2025 ला मृतक नामदेव लक्ष्मण गडे यांनीआपल्या गावामधील नातेवाईक नीलकंठ परसराम वाकडे यांचे शेतात वटाण्याची शेंगा तोडण्याकरिता गेला असता आरोपी होमराज नामदेव गडे यांनी तू नीलकंठ परसराम पाकळे यांच्या शेतामध्ये वाटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी कशाला गेलास असे म्हणून त्याला शेतामध्ये मारहाण केली होती त्यावेळी मृतक नामदेव लक्ष्मण गडे राहणार बरडकिनी हा कसा बसा घरी पळून आला.
त्यानंतर रात्र दहा वाजताच्या सुमारास आरोपी नामे होमराज नामदेव गडे यांनी पुन्हा आपले वडील नामदेव लक्ष्मण गडे यास तू नीलकंठ पाकडे च्या शेता मध्ये शेंगा तोडण्यासाठी कशाला गेलास, असे म्हणून आपल्या वडिला सोबत झगडा भांडण करून घरामधील लाकडी काठीने डोक्यावर मारून गंभीर जखमी करून नामदेव लक्ष्मण यास जीवानिशी ठार केले ह व आरोपी होमराज नामदेव गडे यांनी पुरावा नष्ट करण्याकरिता गुन्ह्यामध्ये वापरलेली काठी चुलीमध्ये अर्धवट जाळली, तसेच रक्ताने भरलेले कपडे लपवून ठेवले, आणि फरशीवर सांडलेले रक्त एका कापडी फडक्याने पुसून काढून ठेवल्यानंतर आरोपी हेमराज नामदेव गळे हा पोलीस पाटील विकेश दादाजी निकुरे व 29 वर्ष राहणार बरडकीणी याचे घरी जाऊन माझे वडील मरण पावले आहेत असे सांगितले असता पोलीस पाटील विकास दादाजी निकुरे हे आरोपीचे घरी जाऊन पाहणी केली.
मृतक नामदेव लक्ष्मण गडे यांचे प्रेत रक्तबंबाळ अवस्थेमध्ये समोरच्या फरशीवर पडलेले दिसून आले तसेच आरोपी हा उलट सुलट उत्तरे देत होता, त्यामुळे पोलीस पाटील यांना त्याचा संशय आल्याने व घराजवळच्या लोकांनी या घटनेबाबत माहिती दिल्यावरून या घटनेची माहिती पोलीस पाटील विकेश दादाजी निकोरे यांनी फोन द्वारे पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दिल्याने पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर पोलीस हवालदार अरुण पिसे पोलीस दूरक्षेत्र मेंडकी येथील अमोल लोणबुले रतन लेनगुरे व अनुप कवठेकर व मिलिंद नैताम व इतर पोलीस स्टाफ घटनास्थळी रवाना होऊन लागलीस त्यांनी मृतक नामे नामदेव लक्ष्मण गडे राहणार बरड किनी यांचे प्रेत ताब्यामध्ये घेऊन यांनी घटनास्थळाचा पंचनामा कारवाई केली.
प्रेत शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविले व आरोपी नामे होमराज नामदेव गळे वय 32 वर्ष यास ताब्यामध्ये घेऊन त्याला अटक केली आहे गुन्ह्याच्या घटनास्थळाला माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.
