google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Chandrapur theft case | चंद्रपुरात अटर्नि सोबत लूटमार, शहर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Chandrapur theft case | चंद्रपुरात अटर्नि सोबत लूटमार, शहर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

 Chandrapur theft case : घुग्गुस शहरातील अटर्नी आपल्या ग्राहकाला जात प्रमाणपत्र द्यायला चंद्रपूरला निघाला होता. चंद्रपुरात आल्यावर गौतमनगर वार्ड मार्गे महाकाली कॉलरी परिसरात जाण्यासाठी निघाला असता वाटेत 2 युवकांनी अटर्नी थांबवित 5 हजार रुपये रोख, मोबाईल व दुचाकी वाहन हिसकावीत तिथून पळून गेले. याबाबत अटर्नी यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असता काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

Chandrapur theft case


हि घटना 8 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता घडली. 46 वर्षीय अटर्नी रवींद्र विठ्ठल वानखेडे हे अटर्नी म्हणून काम करतात, 8 फेब्रुवारीला चंद्रपूर शहरात राहणाऱ्या ग्राहकाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी वानखेडे चंद्रपुरात आले होते मात्र वाटेतच गुन्हेगारी वृत्तीने त्यांच्यासोबत लुटमारी केली. त्यांनी वेळ न गमावता शहर पोलिसात याबाबत तक्रार नोंदविली. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. 

चंद्रपुरात गांजा विक्री करणाऱ्या 64 वर्षीय आरोपीला अटक

गुन्हे शोध पथकाने खबरी नेटवर्क सक्रिय करीत माहिती घेतली व तक्रारीत सदर वर्णन असलेले युवक दुचाकीने फिरत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार 38 वर्षीय राजू दिलीप एंगलवार, 22 वर्षीय अक्षय उर्फ मॅक्सि पुंडलिक वाघमारे या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपीकडून 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि संदीप बच्च्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोषकुमार कनकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चितोडे, विक्रम मेश्राम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने