elderly involvement in drug trafficking : शिकण्यासाठी वय नसतं हे खरं आहे, कारण ज्ञान प्राप्ती ही कधीही होते, शिक्षणामुळे मानवी जीवन प्रगतशील होते. तर दुसरीकडे आता गुन्हेगारीसाठी वय नसतचं गुन्हा हा वेळ सांगून घडत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील 64 वर्षीय इसम हा गांजा विक्री च्या गुन्ह्यात पोलिसांच्या तावडीत सापडला, त्याचं वय बघून सध्या सर्वच अवाक झाले कारण सध्या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आढळत असताना आता जेष्ठ नागरिक सुद्धा या गुन्हेगारीच्या मैदानात आपली उपस्थिती दर्शवू लागले आहे.
बल्लारपूर शहरातील 64 वर्षीय लालचंद गणेश केसकर राहणार सरदार पटेल वार्ड, काम मजुरीचे मात्र आपल्या आर्थिक फायद्यासाठी ते गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाले.
आणि गांजा विक्री व वाहतूक करू लागले. मात्र पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याने लालचंद केसकर लपू शकला नाही.
7 फेब्रुवारीला बल्लारपूर शहरातुन चंद्रपूर कडे गांजा विक्री करण्यासाठी लालचंद आपली दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 सिएल 5025 ने निघाला होता.
या गुन्ह्यांची चाहूल स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, बल्लारपूर ते चंद्रपूर जवळील चुनाभट्टी येथे पोलिसांनी सापळा रचला.
लालचंद आपल्या दुचाकीने येत असताना पोलिसांनी त्याला थांबवित वाहनाची झडती घेऊ लागले वाहनांच्या डिक्कीत 5 किलो 478 ग्राम हिरवे कॅनबीस गांजा आढळून आला.
स्थानिक गुन्हे शाखेने 1 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी लालचंद केसकर यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम NDPS अंतर्गत 1985 मधील कलम 8(क), 20(ब) (ii), (ब) अनव्ये गुन्हा दाखल करीत पुढील तपासकामी बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनी मधुकर सामलवार, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, रजनीकांत, चेतन, महंतो, प्रशांत, प्रफुल, किशोर वाकाटे यांनी केली.
