Mephedrone drug trade in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गांजा नंतर एमडी मेफेड्रोन पावडरची जोमात विक्री सुरु आहे, पोलीस यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र तरीही छुप्या पद्धतीने हा नशा युवकांपर्यंत पोहचत आहे.
२० मार्चला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीच्या आधारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाकाली कॉलरी बँकर जवळ नाकेबंदी करीत दोन दुचाकी वाहनाने येणाऱ्या इसमांना थांबविता त्यांची झडती घेतली. यावेळी त्या इसमाकडून मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आले. Chandrapur police MD powder seizure
रिकाम्या घरी घरफोडी, तळोधी पोलिसांनी आरोपीला केली अटक
आरोपी जुनेद आवेश शेख यांच्याकडून ५.५६ ग्राम तर वृषभ धोंगडे जवळून ३.५९ ग्राम एमडी पावडर जप्त करण्यात आले. या प्रकरणात आरोपी कालू पठाण पसार झाला असून तिन्ही आरोपींवर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुंगीकारक औषध मनोव्यापारावर पररीनं करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीकडून मोबाईल, दुचाकी व एमडी पावडर असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, गोपीनाथ नरोटे, दिनेश अराडे यांनी केली.
