home burglary news : रुग्णालयीन कामासाठी कुटुंब बाहेर गेले, घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी डाव साधत घरातील सोने-चांदी व रोख रक्कम पळवली. अशी तक्रार 5 मार्चला तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि दोघांना अटक करण्यात आली.
फिर्यादी व कुटुंब हे रुग्णालयीन कामासाठी बाहेर गावी गेले होते, त्यावेळी घरी कुणी नव्हते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. police investigation case
सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण 72 हजारांचा मुद्देमालावर हात लंपास केला.
चंद्रपुरात एमडी पावडरचा धुरळा, 2 आरोपीना अटक
फिर्यादी व कुटुंबीय जेव्हा घरी आले त्यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला, 5 मार्चला चोरीची तक्रार तळोधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरू करीत घरफोडी करणारे आरोपी खेमराज आबाजी बारसागडे व पुरुषोत्तम मानिराम बांबोडे ला अटक केली, दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीचा गुन्हा कबूल केला.
आरोपीजवळून चोरी गेलेले दागिने व रोख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. cash and gold theft
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संगीता हेलांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, पोलीस कर्मचारी हंसराज सिडाम, सचिन साखरकर, राजू चिमुरकर व नरेश फंडे यांनी केली.
