Chandrapur construction theft : चोरी, लूटमार, अंमली पदार्थाची तस्करी नंतर आता बांधकाम साहित्याच्या चोरीचे प्रमाण चंद्रपुरात वाढू लागले आहे, अश्याच एका टोळक्याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्यांच्याजवळून ५ लक्ष ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२१ एप्रिलला सिव्हिल लाईन, पटवारी ऑफिस जवळ ठेवलेले रस्त्याच्या कामाकरिता ३१ मग लोखंडी चॅनेल अज्ञात चोरांनी चोरून नेले अशी फिर्याद रवींद्र चहारे यांनी २३ एप्रिल रोजी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली.
चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपी २४ वर्षीय हर्षद कालिदास मेश्राम, राहणार अष्टभुजा वार्ड, ३० वर्षीय धनराज सुधार लोणारे राहणार गोपाळपुरी वार्ड, २४ वर्षीय आशिष भगवान अल्लेवार राहणार भिवापूर वार्ड व ३८ वर्षीय अमन अजिज शेख राहणार भिवापूर वार्ड यांना गोल बाजार टिळक मैदान मधून ताब्यात घेण्यात आले. Chandrapur Local Crime Branch
आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेने चोरीला गेलेले ३१ लोखंडी चॅनेल व गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा मोपेड गाडी असा एकूण ५ लक्ष ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.
परिचय
-
चंद्रपूरात बांधकाम साहित्याच्या चोरीचे वाढते प्रमाण
-
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
घटना तपशील
-
२१ एप्रिल रोजी चोरीची घटना
-
तक्रारदार रवींद्र चेहरे यांची माहिती
पोलिसांची तपास प्रक्रिया
-
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास
-
आरोपींची ओळख पटवणे
मुद्देमाल जप्ती
-
जप्त केलेले साहित्य: ३१ लोखंडी चॅनेल आणि ई-रिक्षा
-
मुद्देमालाची एकूण किंमत ₹५.७९ लाख
आरोपींची माहिती
-
आरोपींची नावे आणि राहण्याचे ठिकाण
-
पोलिसांनी घेतलेली अटक
