chandrapur liquor smuggling : चंद्रपूर शहर पोलिसांनी अवैध दारूची वाहतूक करताना २ युवकांना अटक केली असून आरोपीजवळून एकूण १ लक्ष ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना २४ एप्रिल रोजी मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ वर्षीय सूरज अशोक दुर्गे राहणार एटापल्ली रॉड आलापल्ली, जिल्हा गडचिरोली व २६ वर्षीय वीरेंद्र बहादूर सेनगारप राहणार मातानगर, लालपेठ चंद्रपूर दोघांना अटक केली. chandrapur police action
भद्रावतीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त, महिलेला अटक
पोलिसांनी यावेळी देशी दारू, २ दुचाकी वाहन असा एकूण १ लक्ष ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चिताडे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली.
%20(3).webp)