google-site-verification=cB7MfS0jnAVwFn50h8c-_J4v-z_Uk97T6lzLaNbiLrc Chandrapur city police | चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडले एमडी, 1 आरोपी अटकेत

Chandrapur city police | चंद्रपूर शहर पोलिसांनी पकडले एमडी, 1 आरोपी अटकेत

 Chandrapur city police : चंद्रपूर शहरात अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून अल्पवयीन व तरुण मुले नशेच्या आहारी जात आहे या व्यसनामुळे अनेक गुन्हे चंद्रपुरात घडलेले आहे. २४ जानेवारीला शहर पोलिसांनी एमडी ड्रग्स ची विक्री करणाऱ्याला अटक केली.

Chandrapur city police


चंद्रपूर शहर पोलिसांनी नशेचा बाजार बंद करण्यासाठी कारवाई सत्र सुरु केले असून या धर्तीवर २४ जानेवारीला शहरातील हनुमान खिडकी जवळ आशिक कुरेशी एमडी ड्रग्स विकत असल्याची बाब पोलिसाना कळताच त्यांनी त्याठिकाणी धडक देत आशिक शेख ला अटक केली. एक आरोपी यावेळी पसार झाला.

आरोपी आशिक शेख व पसार झालेला आवेश कुरेशी हे दोघे संगनमत करीत शहरात एमडी विकण्याचे काम करीत होते. पोलिसांनी आशिक कुरेशी जवळून एमडी पावडर व दुचाकी वाहन असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केला. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने